ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणात रात्री उशीरापर्यंत वीज पुरवठा सुरु होईल असे प्रयत्न ; कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहितेंनी दिले संकेत.

मालवणात रात्री उशीरापर्यंत वीज पुरवठा सुरु होईल असे प्रयत्न ; कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहितेंनी दिले संकेत.

प्रकाशन: 22 Sep 2022 08:41 PM
वाचन संख्या 343

खारेपाटण येथील आगीवर मिळवले नियंत्रण.

मालवणसह देवगड, वैभववाडीतील मात्र वीजपुरवठा आहे ठप्प..!

कणकवली | ब्युरो न्यूज : आज दुपारी उशिरा ४ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या ‘खारेपाटण विद्युत पारेषणच्या’ सब स्टेशन मधील ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगी वर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. कणकवली नगरपंचायत आणि राजापूर नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने ही आग विझवली.
मात्र अजुनही मालवण, देवगड व वैभववाडी तालुक्यातील वीजपुरवठा ठप्प आहे.
रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर काम सुरू असल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिली.
गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास या ट्रांसफार्मरला लागलेली आग कणकवली नगरपंचायत च्या अग्निशमन बंबाने विजवण्यात आली. मात्र यामुळे खंडित झालेल्या वीजपुरवठ्यापैकी कणकवली तालुक्यातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर देवगड वैभववाडी व मालवण तालुक्यातील वीजपुरवठा खंडित आहे हा वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याच्या दृष्टीने महावितरण व महापारेषण चे कर्मचारी युद्ध पातळीवर कार्यरत आहेत रात्री उशिरापर्यंत हा वीजपुरवठा सुरू होईल यादृष्टीने सर्व प्रयत्न सुरू असल्याचे श्री मोहिते यांनी सांगितल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स