ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण आरसेमहाल नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात.

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण आरसेमहाल नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात.

प्रकाशन: 22 Sep 2022 07:24 PM
वाचन संख्या 355

२ कोटी ९७ लाख रुपये निधी मंजूर ; आ. वैभव नाईक यांनी जातीने केली कामाची पाहणी .

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या वैभवशाली सौंदर्यात भर पाडणाऱ्या सुप्रसिद्ध आरसेमहाल , शासकीय विश्रामगृहाची इमारत मोडकळीस आल्याने त्या इमारतीचे नुतनीकरण करणे गरजेचे होते. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी हा कळीचा मुद्दा विचारात घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे ,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे निधी मंजुरी साठी पाठपुरावा केला होता.

आमदार वैभव नाईक यांच्या सकारात्मक धोरण व यशस्वी पाठपुराव्यामुळे आरसेमहाल, शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी बजेट मधून २ कोटी ९७ लाख रु.निधी मंजूर करण्यात आला होता.
या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून आजपासून कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. आज आमदार वैभव नाईक यांनी याठिकाणी भेट देत कामाची पाहणी केली. कामाची गुणवत्ता व दर्जाबाबत त्यांनी संबंधीत ठेकेदाराला सूचना केल्या.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, सन्मेष परब, दीपक देसाई, किरण वाळके , नरेश हुले, जावकर ठेकेदार प्रतिनिधी अभियंता संजय कदम उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स