सी वर्ल्ड प्रकल्पातील भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्यासाठी जमीन मालकांनी घेतली उपजिल्हाधिकार्यांची भेट.
पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून भेट घडल्याची विष्णू मोंडकर यांनी दिली माहिती.
विष्णू मोंडकर आहेत जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष.
मालवण | सुयोग पंडित :सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी सी वर्ल्ड भूसंपादनाबाबत जमीन मालकांनी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतल्याची माहिती दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून घोषित होऊन दोन दशकांपेक्षा जास्त काळ होऊन गेला असूनही पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत पर्यटन वाढीसाठी म्हणावे तसे प्रयत्न झाले नाही .
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसाय व रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत गरज आहे ती शासन स्तरावर या दिशेने काम होण्याची.पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून बारमाही पर्यटन वाढीसाठी आवश्यक असलेला आतंराष्ट्रीय प्रकल्पापैकी एक असलेल्या सी वल्ड प्रकल्प ३५० एकर क्षेत्रात होण्यासाठी प्रयत्न चालू केला असून त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा उपजिल्हाधिकारी श्री वर्षा शिंगण-पाटील ,भूसंपादन यांची भेट तोंडवळी ,वायंगणी येथील जमीन मालकासोबत भेट घेऊन सि वल्ड भूसंपादन प्रक्रिया सुरु करणे बाबत भेट घेण्यात आली त्यावेळी जमीन मालकांच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात यात जमीन मालकांमार्फत विनंती करण्यात आली की आम्ही सर्व जमीन मालक गाव तोंडवळी,वायंगणी ता.मालवण .जि.सिंधुदुर्ग येथे स्वपांदित वडिलोपार्जित जमिनी असून सदर जमिनी शासनाने जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी ठरविलेल्या सी वर्ल्ड प्रकल्पासाठी देण्यास तयार आहोत.तसेच या विषय संदर्भात माजी पर्यटन मंत्री श्री जयकुमार रावल यांच्या अध्यतेखाली मंत्रालय मुंबई येथे जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी श्री.पांढरपट्टे उपस्थितीत झालेल्या मिटींग मध्ये सदर प्रकल्प भूसंपादन प्रक्रिया संदर्भात आदेश झाले असून तीन वर्षे होऊनही प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित आहे .या विषयी आपल्या स्तरावर भूसंपादन प्रक्रिया चालू करण्याचे आदेश व्हावेत ही विनंती करण्यात आली तसेच या प्रलंबित विषयी आवश्यक त्या पर्यटन विभाग व शासन वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा अशी विनंती जमीन मालकामार्फत करण्यात तसेच पर्यटन व्यावसायिक महासंघा तर्फे सदर प्रोजेक्ट मुळे पर्यटन क्षेत्रात व्यवसाय व रोजगार क्षेत्रात जिल्ह्या राज्यात अग्रेसर होऊ शकतो या संधर्भात पर्यटन महासंघ अध्यक्ष श्री विष्णु मोंडकर यांनी महासंघाची जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी या प्रकल्पाची आवश्यकता स्पष्ट केली. यावर बोलताना उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांनी सदर जमीन मालकांच्या मागणी विषयी शासन स्तरावर मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी जमीन मालक श्री हनुमंत प्रभू ,श्री आनंद जामसंडेकर ,श्री श्रीकांत गिरकर ,श्री आत्माराम कुमठेकर तसेच पर्यटन व्यवसाययिक महासंघ पदाधिकारी श्री नकुल पार्सेकर ,श्री मंगेश जावकर,श्री किशोर दाभोलकर हे उपस्थित होते अशी माहिती महासंघ अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी दिली .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)