कणकवली पोलीस ठाण्यातर्फे झाला सेवानिवृत्त पोलीस पाटीलांचा सत्कार ….!
उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे व निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी केला सन्मान.
कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पोलिस ठाण्याच्या वतीने दोन पाटिलांचा सत्कार करण्यात आला.
कणकवली ठाणे मागील काही वर्षांपासून तालुक्यातील गावा – गावातील पाटील यांचे सन्मानपत्र देऊन त्यांचा कार करते. कायदा व सुव्यवस्था ही त्या त्या पातळीवर सुस्थितीत राहण्यासाठी एका कर्तव्यदक्ष व्यक्तीची गरज असते. गावपातळीवर गावातील कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी संबंधीत गावात ग्रामस्तरावर पाटील नेमला जातो. गावात घडणाऱ्या घडामोडी आणि कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा नेहमीच सतर्क असतो. एका कर्तव्यदक्ष ाप्रमाणे पाटील हा काम करत असतो अशी या सत्कारामागची ठाण्याची भावना आहे.
आज कणकवली ठाण्याच्या वतीने सन्मानपत्र देऊन पाटील कासम इब्राहिम शेख ( साकेडी ) व दिलीप गणपत साटम (आयनल) यांच सत्कार करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहा. निरीक्षक सागर खंडागळे, उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, कॉन्स्टेबल किरण मेथे, कॉन्स्टेबल सागर मासाळ आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)