ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
साळशी गावात हरी नाम सप्ताह उत्साहाने संपन्न...!

साळशी गावात हरी नाम सप्ताह उत्साहाने संपन्न...!

प्रकाशन: 22 Sep 2022 06:59 PM
वाचन संख्या 414

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
विठ्ठल नामाची शाळा भरली…विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला… पंढरीचा विठ्ठल विटेवरी… हरिनामाचा गजर होतो साळशी गावात… या सारख्या भक्तीगीता बरोबरच टाळ-मृदुंगाच्या व विठ्ठल नामाच्या गजराने अवधी साळशी दुमदुमून गेली. या हरिनाम सप्ताहात साळशी येथील श्री सिध्देश्वर पावणाई प्रासादिक भजन मंडळाने काढण्यात आलेला पौराणिक चित्र देखावा सर्वांचाआकर्षण ठरुन उपस्थितांची मने जिंकली.
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व ८४ खेड्यांचा अधिपती असलेल्या देवगड तालुक्यातील साळशी येथील श्री देवी पावणाई देवालयात अखंड हरिनाम सप्ताह १५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत संपन्न झाला. या हरिनाम सप्ताहानिमित्त श्री पावणाई देवालयात आकर्षक विद्युत रोषणाई मंदिर सजावट करण्यात आली होती.
या हरिनाम सप्ताहाच्या कालावधीत वरेरी, मठ बुद्रुक, भरणी , कासार्डे ,चाफेड- घाडीवाडी आणि भोगलेवाडी , आयनल, निरोम, नागवे ,कोळोशी, किंजवडे, कुवळे -घाडीवाडी, बापार्डे ,रेंबवली, शिरगाव, हुंबरणे, बांदिवडे, वळीवंडे आदी गावातुन २० भजनी मेळे सहभागी होवुन हरिनामाचा जागर केला. तसेच कोळोशी येथील नवजीवन भगीनी महिला भजन मंडळाच्या सहभागामुळे हरिनाम सप्ताहाची रंगत आणखीनच वाढली.साळशी -अंगणवाडीनेही हरिनाम सप्ताहात सहभाग घेतला होता.
या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सातव्या रात्री साळशी येथील श्री सिध्देश्वर पावणाई प्रासादिक भजन मंडळाने रंगीत दिंडी काढून ‘मेगासुर वध’ हा पौराणीक चित्र देखावा सादर करून भाविकांची मने जिंकली. यामध्ये मेगासुर-संतोष नारिंग्रेकर ,जटायू- मिलिंद माळवदे ,बाल हनुमान- धीरज घाडी यांनी भूमिका साकारल्या होत्या. तसेच हिरोजी नाईक, निलेश नाईक, राजेंद्र घाडी, प्रविण नाडणकर व श्रेयस नाडणकर यांनीही आकर्षक वेशभुषा सादर केली होती. या हरिनाम सप्ताहाची सांगता २२ सप्टेंबरला पहाटे काकड आरतीने झाली.
या हरिनाम सप्ताहामुळे साळशी गावात भक्ती मय वातावरण निर्मिती झाली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स