दुसरीतील विद्यार्थिनीला मण्यार सापाचा दंश..!
माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत, भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची उपजिल्हा रुग्णालयात धाव घेत तत्परता.
कणकवली | ब्युरो न्यूज: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील वागदे केंद्र शाळेत दुसरीत शिकणाऱ्या सात वर्षीय विद्यार्थिनीला मण्यार जातीच्या सापाचा दंश झाल्याने तिला विद्यार्थिनीला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हा प्रकार आज गुरुवारी दुपारी ३ वाजता घडला. ही बाब शाळेतील शिक्षकांच्या लक्षात येताच त्या विद्यार्थिनीला तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत, भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी उपजिल्हा रुग्णालयात तत्परतेने धाव घेतली.
शाळेच्या आवारात हा प्रकार घडला असल्याने त्या विद्यार्थिनीवर योग्य उपचार होण्यासाठी खाजगी रुग्णालयात तात्काळ उपचार करता दाखल करा अशी मागणी केली. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात या उपचाराकरता पुरेशी व्यवस्था नसल्याने खाजगी रुग्णालयात या मुलीवर उपचार करावे अशी मागणी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांमधून देखील होत आहे. शाळेच्या आवारात ही विद्यार्थिनी खेळत असताना मण्यार जातीच्या सापाचा दंश झाल्याचा प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला. तिच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. संतोष चौगुले यांनी दिली..
फोटो: प्रातिनिधिक ( गुगल साभार संग्रहीत)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)