जागतिक पर्यटन दिनानिमीत्त महिलांकरीता जिल्हास्तरीय फळे , फळभाज्या व भाज्या यापासून सॅलेड डेकोरेशन स्पर्धेचे वेंगुर्लेत आयोजन.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
२७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन जगभर मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो . पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने व वेंगुर्ले तालुक्यातील विविध संस्थांच्या वतीने साईदरबार हाॅल, वेंगुर्ला येथे मंगळवार दिनांक २७ सप्टेंबरला सदर सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे . त्यानिमित्ताने महिलांसाठी जिल्हास्तरीय फळे, फळभाज्या व भाज्या यांपासून सॅलड डेकोरेशन स्पर्धा दुपारी (२ ते ६-३०) वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे . विजेत्या स्पर्धकांना रु २०००,१५००.१००० व उत्तेजनार्थ दोन अशी पाच रोख बक्षिसे , तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील . तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांनी या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद देऊन सहभागी व्हावे असे आवाहन वेंगुर्ले तालुका पर्यटन महिला समितीतर्फे करण्यात आले आहे.
त्यासाठी आधी संपर्क साधून आपली नाव नोंदणी ९४२२०७७४६६ या नंबरवर करायची आहे. ही विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)