खारेपाटणात एम. एस. सी. बी. बोर्डमधून आगीचे लोट….!
कणकवली | ब्युरोन्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या खारेपाटणात पाॅवर स्टेशन तथा विद्युत यंत्रणेमध्ये मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विद्युत वाहिन्यांनी पेट घेतला आहे. त्यातून लोट उसळताना दिसून येत आहेत.
या मुळे खारेपाटणात व जिल्ह्यात काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाला असून ही आग नेमकी कशी आणि त्या बोर्ड ने पेट कसा घेतला हे अद्याप समजू शकले नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खूपशा गावांना खारेपाटण वीज केंद्रातून वीज पुरवठा होतो.
आज सायंकाळी साडेचारला तिथे आग लागली आहे. वीज केंद्र परिसरात असलेल्या डीपींमधून आगीच्या ज्वाळा उठत आहेत. येथील आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी आग अद्याप नियंत्रणात आलेली नाही. दरम्यान घटनास्थळी स्थानिकांनी गर्दी केली आहे. तसेच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी देखील खारेपाटणला गेले आहेत. खारेपाटण येथील वीज केंद्राला आग लागल्याने अनेक गावांचा वीज पुरवठाही खंडित झाला आहे. दरम्यान धुराचे लोट तयार होत आहेत. तसेच स्फोटाचे आवाज येत असल्याने येथील नागरिकांमध्ये घबराट आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत अग्निशमन बंब दाखल झालेला नाही त्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांकडून आग शमवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत असे सूत्रांकडून समजते आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)