ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कोकण शिक्षक मतदार संघातील मतदार धनाजी पाटील यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी भेट..!

कोकण शिक्षक मतदार संघातील मतदार धनाजी पाटील यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी भेट..!

प्रकाशन: 22 Sep 2022 01:13 PM
वाचन संख्या 45

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक लवकरच संपन्न होत आहे. या निवडणुकीसाठी शिक्षक भारतीने अधिकृत उमेदवार म्हणून धनाजी पाटील यांची निवड केली आहे.कोकण विभागीय अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या धनाजी पाटील यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकाऱ्यांची धावती भेट घेतली.
यावेळी निवडणूकीबाबत चाललेल्या घडामोडींचा आढावा घेतला.यावेळी शिक्षक भारतीचे कोकण विभागीय अध्यक्ष आणि कोकण शिक्षक मतदार संघातील उमेदवार धनाजी पाटील यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले.यावेळी धनाजी पाटील यांनी शिक्षकांना उपयुक्त ठरणारे संकलन शिक्षकांसाठी या संग्रहाच्या निर्मिती केल्याबद्दल, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील अधिक चांगल्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. नुकतेच या शिक्षकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणाऱ्या संग्रहित पुस्तकाचे आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन करण्यात आले आहे.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना धनाजी पाटील यांनी कोकण विभागातील शिक्षक मतदार संघात आलेले विविध अनुभवांचा गोषवारा सादर केला. सध्या शिक्षकांमधून केवळ शिक्षकी पेशात कार्य असणाराच प्रतिनिधी विधान परिषदेवर प्रतिनिधी म्हणून निवडून दिला जावा या मताने जोर पकडला आहे.शिक्षक भारतीनेही सुमारे 35 वर्षे एवढा शिक्षक चळवळीमध्ये दीर्घकाळ काम केलेल्या धनाजी पाटील यांच्यासारख्या जेष्ठ कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन शिक्षकांच्या विचाराला रीतसर पाठिंबा पाठबळ दिले आहे. त्यामुळे शिक्षक वर्गातून उत्स्फूर्त पाठिंबा धनाजी पाटील यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळू लागल्याचे चित्र सर्वत्र आहे.त्यामुळे शिक्षक भारतीच्या पदाधिकाऱ्यांत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.दरम्यान या सभेच्या वेळी धनाजी पाटील आणि संजय वेतुरेकर यांनी शिक्षक मतदार नोंदणीच्या कार्यपद्धती विषयी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सविस्तरपणे माहिती दिली. सर्व तालुक्यातील शाळा मधून पात्र असलेल्या सर्व शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी फॉर्म सादर केला जाईल याबाबत काळजी घ्यावी असे आवाहन केले. जिल्ह्यातील सर्व पात्र शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी करण्याबाबत नियोजन करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स