ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मडुरा नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी दत्ताराम परब ; सचिवपदी संतोष परब यांची फेरनिवड.

मडुरा नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी दत्ताराम परब ; सचिवपदी संतोष परब यांची फेरनिवड.

प्रकाशन: 21 Sep 2022 01:46 PM
वाचन संख्या 25

बांदा | राकेश परब :
मडुरा येथील श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी दत्ताराम परब यांची नुकत्याच संपन्न झालेल्या सभेत एकमताने निवड करण्यात आली. संतोष परब यांची सचिवपदी फेरनिवड झाली. नवरात्रोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजनही बैठकीत करण्यात आले.

Article image
श्री. संतोष परब (सचिव)


मडुरा माऊली नवरात्रोत्सव समितीची सभा माऊली मंदिर सभागृहात संपन्न झाली. यावेळी माजी अध्यक्ष अनंत परब, नकुळ परब, सोमनाथ परब, दत्ताराम परब, बाळू गावडे, दिलीप परब, संदिप परब, सुमंत गावडे, अरुण परब, विजय परब, रामा परब, दाजी सातार्डेकर, नारायण परब, भूषण परब, नितीन नाईक, विद्या धारगळकर, नाना परब आदींसह समितीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवरात्रोत्सवातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन सभेत करण्यात आले. दैनंदिन पूजाअर्चा, हार व फुले, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, भजने व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल उत्सवात असणार आहे. प्रास्ताविक व आभार सचिव संतोष परब यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स