तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मातोश्री विद्यालयाचे यश..!
बांदा | राकेश परब :
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व वेंगुर्ले पंचायत समिती यांच्या माध्यमातून आयोजित ४९ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत विद्यालय (इंग्रजी माध्यम) प्रशालेने माध्यमिक गटात प्रथम क्रमांक मिळविला. मान्यवरांच्या हस्ते प्रशालेच्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
प्रशालेच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प. म. राऊत, चिटणीस डॉ. विनय राऊत, मुख्य सल्लागार एम. पी. मेस्त्री, प्रशालेच्या मुख्याध्यापिका गीता विल्सन, प्रशालेचे सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व सहाय्यक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)