ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मडुरा बाबरवाडीत धोकादायक स्थिती ; अभियंत्यांमध्येही मतभेद.

मडुरा बाबरवाडीत धोकादायक स्थिती ; अभियंत्यांमध्येही मतभेद.

प्रकाशन: 21 Sep 2022 01:55 PM
वाचन संख्या 27

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या मडुरा – बाबरवाडीत, ११ केव्ही विद्युत तारांच्या हद्दीवरुन बांदा सहाय्यक अभियंता १ व २ या दोघा अधिकार्‍यांमध्ये मतभेद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्युत वाहिन्यांवरील झुडपांची सफाई कोणी करायची असा प्रश्न उभा राहिला आहे. धोकादायक परिस्थिती ओळखून महावितरणने आपापसातील मतभेद मिटवून तातडीने झुडपांची सफाई करण्याची मागणी बाबरवाडीतील युवकांनी केली आहे.

मडुरा बाबरवाडी येथून कास – शेर्ले सीमेवरील डिवायन मर्सी येथे ११ केव्हीच्या विद्युत तारांची जोडणी करण्यात आली आहे. सदर वाहिनीवर झुडपे वाढल्याने स्पार्किंग होण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवाय ११ केव्हीच्या खाली बाबरवाडी स्ट्रीट लाईन असून स्पार्किंगमुळे आतापर्यंत ९० हून अधिक बल्बचे नुकसान झाले आहे. भविष्यात स्पार्किग होऊन आग लागण्या बरोबरच अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरणने तातडीने झुडपांची सफाई करण्याची मागणी बाबरवाडीतील युवकांनी महावितरणकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मडुरा – बाबरवाडी येथे ११ केव्हीच्या तारा ठिकठिकाणी स्पार्क होत असल्याने आगीच्या ठिणग्या वारंवार उडत असतात. अनेक वर्षांपासून झुडपांची सफाई करण्यात न आल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार महावितरणच्या अधिकार्‍यांना समज देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे बाबरवाडीतील युवकांनी बांदा सहाय्यक अभियंता अनिल यादव यांना निवेदन सादर केले.
मात्र, ११ केव्ही लाईन हद्दीवरुन दोन अभियंता मध्ये झुडपे सफाईची जबाबदारी कोणाची यावरून खडाजंगी झाली. येत्या ८ दिवसात झुडपांची सफाई करण्याची मागणी शैलेश धुरी, दिगंबर धुरी, स्वप्निल धुरी, लाडू धुरी, तुषार धुरी, रितेश पावसकर, धुरी यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा होणार्‍या दुष्परिणामांना महावितरण जबाबदार असल्याचा इशाराही दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स