ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप…!

प्रकाशन: 21 Sep 2022 11:11 AM
वाचन संख्या 57

पंतप्रधान नरेंद्र मोदी व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त माजी वित्त व बांधकाम सभापती श्री संतोष साटविलकर यांच्या माध्यमातून आयोजन….!

चौके | अमोल गोसावी :
भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण भारत देशात ठिकठिकाणी सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे. यातच कोकणचे सुपुत्र सार्वजनिक बांधकाम कॅबिनेट मंत्री रविंद्रजी चव्हाण साहेब या दोहोंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कट्टा येथे वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महा. कट्टा याठिकाणी माजी वित्त व बांधकाम सभापती श्री संतोष साटविलकर यांच्या माध्यमातून व संदेश युवा प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने वह्या वाटप व मुलांना जिलेबी वाटप कार्यक्रम माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संजना संदेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपंन्न झाला.
यावेळी माजी जि प अध्यक्षा संजना सावंत , माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर ,संस्था सचिव सुनिल नाईक ,विजयश्री देसाई, शालेय समिती अध्यक्ष सुधिर वराडकर ,माजी सरपंच सतिश वाईरकर , स्वाती वाईरकर, माजी उपसरपंच आबा कामतेकर , शेखर पेणकर,मकरंद सावंत, ग्राप सदस्या मयुरी कुबल ,शेखर मसुरकर,सागर मालवदे,सुहास कुबल, मुख्याध्यापक संजय नाईक ,ऋषी नाईक ज्येष्ठ शिक्षिका राऊळ मॅडम, महेश भाट ,समिर चांदरकर ,भूषण गावडे व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीउपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय नाईक व आभार प्रदर्शन संजय पेंडूरकर यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स