उद्या मालवणात सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनची सभा.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील तालुकास्कूल मध्ये उद्या २२ सप्टेंबरला जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा मालवण कार्यकारिणीची मासिक सभा तालुकाध्यक्ष विजय चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या सभेत जिल्ह्यात होणाऱ्या मेळाव्यासंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. या सभेला जिल्हा प्रतिनिधी कृष्णा पाताडे व प्रताप बागवे मार्गदर्शन करणार आहेत. मालवण तालुक्यातील सर्व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन सचिव रुपाली पेंडुरकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)