विनोदाचा सेवक हरपला..!
सिनेपट | ब्युरोन्यूज : सुप्रसिद्ध विनोदवीर तथा कॉमेडियन म्हणून ओळखले जाणारे राजू श्रीवास्तव यांचे आज निधन झाले. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होती. परंतु आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.कॉमेडियन राजू श्रीवास्तव जवळपास एका महिन्याहून अधिक काळ रुग्णालयात दाखल करण्यात होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. १० ऑगस्टपासून राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक स्तरावर श्री. राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीची काळजी घेणार्या टीमशी संवाद ठेवलेला होता असेही सूत्रांकडून समजले होते.
गेले आठवडाभर त्यांच्या मृत्युच्या अफवा उठत होत्या पण त्या अफवांचे दोनच दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबियांनी एका प्रसिद्धीपत्राद्वारे खंडन केले होते.
देशभरातील सिनेमासृष्टी व नाट्यसृष्टी तसेच स्टॅन्ड अप विनोदविरांच्या क्षेत्रातून राजू श्रीवास्तव यांच्या जाण्याने शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)