ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवलीत नेहरू युवा केंद्रांमार्फत राबविण्यात आली स्वच्छता मोहीम .
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवलीत नेहरू युवा केंद्रांमार्फत राबविण्यात आली स्वच्छता मोहीम .

प्रकाशन: 20 Sep 2022 09:27 PM
वाचन संख्या 42

रोट्रॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, कणकवली नगरपंचायत, अनुभव शिक्षा केंद्र व साद टीमचे सहकार्य.

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत काल नेहरु युवा केंद्रामार्फत कणकवली येथे नेहरू युवा केंद्र, रोट्रॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, कणकवली नगरपंचायत, अनुभव शिक्षा केंद्र आणि साद टीम यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या उपक्रमा दरम्यान कणकवली नरडवे नाका ते कणकवली हॉस्पिटलपर्यंतचा परिसर यावेळी स्वच्छ करण्यात आला. सामाजिक स्वास्थ्य जोपासण्यासाठी तसेच स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी नेहरू युवा केंद्राच्या वतीने ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमे अंतर्गत रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या दुकानदारांना दुकानाबाहेर कचरा होऊ न देण्यासाठी सूचना देण्यात आल्या. तसेच प्लॅस्टिकमुळे संभावणारे धोके आणि मुक्या प्राण्यांना होणारे जीविताचे धोके याबाबत माहिती देण्यात आली. ‘प्लॅस्टिकला नको म्हणा’ असे सांगत प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करण्याच्या सूचना उपस्थितांना देण्यात आल्या. या उपक्रमात नेहरू युवा केंद्राचे कणकवली तालुका समन्वयक अक्षय मोडक, देवगड तालुका समन्वयक सुजय जाधव, कुडाळ तालुका समन्वयक विल्सन फर्नांडिस, रोट्रॅक्ट क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या अध्यक्षा रोट. श्रद्धा पाटकर, रोट. अवंतिका कांबळे, रोट. आकांक्षा कदम, रोट. राजस कदम, अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, श्रेयश शिंदे तसेच कणकवली नगरपंचायतचे स्वच्छता कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. या सामाजिक उपक्रमात सहभागी झालेल्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स