ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
असनिये गावचे माजी सरपंच, तथा ज्येष्ठ शिक्षक गजानन लाडू सावंत यांचे निधन..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

असनिये गावचे माजी सरपंच, तथा ज्येष्ठ शिक्षक गजानन लाडू सावंत यांचे निधन..!

प्रकाशन: 20 Sep 2022 09:56 PM
वाचन संख्या 76

बांदा | राकेश परब :
असनिये गावचे माजी सरपंच, तथा श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक गजानन लाडू सावंत (वय ५२) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कुडाळ येथे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या आकस्मिक अकाली निधनाने सावंत कुटुंबीयांसह असनिये, बांदावासीय व त्यांच्या मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील एका दातृत्ववान व्यक्तीला मुकल्याने असनिये गावावर शोककळा पसरली. सोमवारी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कुडाळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले.
आपल्या सरपंच पदाच्या कालावधीत त्यांनी अनेक सोयी व सुविधा उपलब्ध करून गावाच्या सर्वांगीण विकासाला दिशा दिली होती. तसेच असनिये गावातील लोकांची एकजूट निर्माण करून गावाच्या शैक्षणिक, क्रिडा, सामाजिक व धार्मिक विकासात योगदान दिले होते. ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रस्थानी असायचे. श्री वाघदेव उत्कर्ष कला व क्रिडा मंडळाचे ते अध्यक्ष होते. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील वरिष्ठाशी सलोख्याचे संबंध होते.असनिये हायस्कूलच्या शिक्षिका जान्हवी सावंत यांचे ते पती, मळगाव हायस्कूलच्या शिक्षिका गीता सावंत- मोर्ये यांचे ते भाऊ होत तर असनिये माजी सरपंच एम. डी सावंत आणि प्रगतशील बागायतदार जनार्दन सावंत यांचे ते पुतणे होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ, एक बहीण, काका, काकी, चुलत भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे. आज असनीये येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स