ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवलीत ठिकठिकाणी एकवीस दिवसाच्या गणरायाचे विसर्जन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवलीत ठिकठिकाणी एकवीस दिवसाच्या गणरायाचे विसर्जन.

प्रकाशन: 20 Sep 2022 09:14 PM
वाचन संख्या 39

रिक्षा चालक-मालक संघटनेच्या सार्वजनिक गणपतीची विसर्जन मिरवणुक वाजत-गाजत संपन्न..!

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहर व तालुक्यातील २१ दिवसांच्या गणपतीचे आज विसर्जन झाले .
“गणपती बाप्पा मोरया…. लवकर या… गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला “अशा पुढच्या वर्षी जयघोषात भाविकांनी २१ दिवसांच्या गणरायाला कणकवली तालुक्यात ठिकठिकाणी निरोप देण्यात आला.
रिक्षा चालक-मालक संघटनेच्या सार्वजनिक गणपतीची शहरातून वाजत-गाजत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली आहे. यानंतर मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. गणरायाच्या आगमानने गणेश भक्तांमध्ये भक्तिमय वातावरण होते. विसर्जनस्थळी गणेशभक्तांनी गणेशमूर्तीचे विसर्जन करत लाडक्या बाप्पाला निरोप दिला. कोरोनाचे सावट ओसरल्यामुळे गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात आणि आनंदात यंदा गणेशोत्सव साजरा केला. रिक्षा संघटनेच्या सार्वजनिक गणपतीची शहरातून बेंजोच्या तालात, ढोल-तशांच्या गजरात आणि फटक्यांची आतषबाजीत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यात रिक्षा चालक मालकांसह गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. संघटनेच्या सार्वजनिक गणेशोत्सवात गेले २० विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यामुळे शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. रिक्षा संघटनेतर्फे प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाचे असंख्य भाविकांनी दर्शन घेतले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स