ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण बाजारपेठेतील श्री देवी भैरवी मंदिरात २६ सप्टेंबर पासून भजन महोत्सवाचे आयोजन..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण बाजारपेठेतील श्री देवी भैरवी मंदिरात २६ सप्टेंबर पासून भजन महोत्सवाचे आयोजन..!

प्रकाशन: 20 Sep 2022 09:10 PM
वाचन संख्या 51

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
मालवण बाजारपेठेतील श्री देवी भैरवी मंदिर याठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त भजन महोत्सव २०२२ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या कालावधीत श्री देवी भैरवी मंदिर, संतसेना मार्ग सोमवार पेठ याठिकाणी दररोज रात्री ८ वाजता भजन सेवा सादर करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील नामवंत भजनीबुवांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन डबलबारी भजनाचे प्रसिद्ध बुवा गुंडू सावंत ( वर्दे ता. कुडाळ) यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे यावेळी दहावे वर्ष आहे. यावेळी नाभिक समाजाचे नेते विजय सीताराम चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, महेश कांदळगावकर, दीपक पाटकर, उद्योजक अनिल मालवणकर, शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी भजनीबुवा गुंडू सावंत यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
सादर होणारी भजने पुढीलप्रमाणे:- २६ सप्टेंबर रोजी श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ बुवा गुंडू सावंत, पखवाज- विराज बावकर.यानंतर श्री गोपाळकृष्ण प्रासादिक भजन मंडळ श्रावण गवळीवाडी बुवा – संजय चव्हाण (पखवाज- संकल्प चव्हाण), २७ रोजी श्री देवी भवानी प्रासादिक भजन मंडळ भोगवे बुवा मदन करलकर, २८ रोजी अष्टपैलू कलानिकेतन मालवण बुवा सुनिल परूळेकर, २९ रोजी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ आनंदव्हाळ बुवा पप्पू सामंत ३० रोजी श्री रेकोबा प्रासादिक भजन मंडळ सुतारवाडी वायरी बुवा अक्षय परूळेकर, १ ऑक्टोबर रोजी श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ कातवड मालवण बुवा मंगेश नलावडे, २ रोजी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ न्हिवे कोळंब मालवण बुवा – राजन दळवी, सिद्धेश पाताडे, ३ रोजी आकारी ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ कांदळगाव कातवड बुवा – चेतन धुरी, ४ रोजी सातेरी प्रासादिक भजन मंडळ कांदळगाव देऊळवाडी बुवा – राजेंद्र कोदे, पखवाज- बंटी कांदळगावकर, दत्ताराम डिकवलकर, ५ रोजी अष्टविनायक प्रासादिक महिला भजन मंडळ साळेल -बुवा अंकिता गावडे यांची भजन होणार आहेत.या महोत्सवात रसिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भैरवी मंदिर बाळगोपाळ मित्रमंडळाचे अध्यक्ष अंकुश चव्हाण, विजय चव्हाण, ललित चव्हाण, जगदीश वालावलकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स