ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र तपासणी शिबीरला उस्फुर्त प्रतिसाद.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र तपासणी शिबीरला उस्फुर्त प्रतिसाद.

प्रकाशन: 20 Sep 2022 04:20 PM
वाचन संख्या 195

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा येथे आज ,’सेवा पंधरावडा व महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त’ माजी खासदार डाॅ. निलेश राणेंच्या संकल्पनेतून ‘प्राथमिक आरोग्य केंद्रात’ आयोजित मोफत वैद्यकीय तपासणी शिबीरला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबीरात विविध आजाराच्या 129 रुग्णांनी तपासणी केली. भारतीय जनता पार्टी मालवण व श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट, भ. क. ल वालावलकर रूग्णालय रोगनिदान व सेविकेंद्र डेरवण, चिपळूण, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.

शिबीरात कॅन्सर, हर्निया, मुतखडे, अल्सर, प्रोस्टेटग्रंथी, अँपेडिक्स, टाँन्सिल, मुळव्याध, चरबिच्या गाठी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, थायराँईड, पित्ताशयातील खडे, कान-नाक-घसा, महिला गर्भाशय अशा आजारांची तपासणी करण्यात आली.
जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांनी ही शिबीरास भेट दिली.

शिबिरात आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र डाॅ. जाधव यांच्यासह डेरवन रूग्णालयातील डाॅ अभिजित भोसिकर-जनरल मेडिसिन, डाॅ. रोहन नागटे-अस्थिरोग तज्ञ, डाॅ. स्वप्निल निकम-शल्य चिकीत्सक, डाॅ. विश्वंभर देवकर-स्री रोग तज्ञ, डाॅ. प्रज्वल कटरे-नाक, कान, घसा, डाॅ. अंकित बोराडे-नेत्ररोग तज्ञ यांनी तपासणी केली तसेच सोशल वर्कर सचिन धुमाळ यांनी महत्वाचे सहकार्य केले. आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेविका, डाॅक्टर मान्यवरांचे सहकार्य लाभले.

माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांनी शिबिराला भेट देवून दी प्रज्वलन केले व रुग्णांची विचारपूस केली .
तसेच आचरा सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणूकीत सहभागी होऊन बाप्पाचा आशिर्वाद घेतला. यावेळी जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, राजु परुळेकर, जि.प. सदस्य-जेराँन फर्नांडीस, भाजप आचरा प्रभारी संतोष गांवकर, विजय निकम, चिंदर सरपंच राजश्री कोदे, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, चिंदर सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, दिगंबर जाधव, शक्तीकेंद्र प्रमुख-दत्ता वराडकर-चंदु सावंत, माजी आचरा सरपंच राजन गांवकर, विक्रांत नाईक, अवधूत हळदणकर, संजय लोके, हनुमंत प्रभू, प्रफुल्ल प्रभू, शेखर कांबळी, विश्वास गांवकर, सचिन हडकर, शशीकांत नाटेकर, मनोज हडकर, सुबोध गांवकर, एकनाथ पवार व इतर मान्यवर व सामान्य नागरीक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स