भरडवरील श्री.दत्त महाराजांच्या मंदिरात प्रश्नोत्तरी भजनाचा सामना….!
‘कीर्तन पंचक २०२२’ अंतर्गत अनोख्या भजनांची रेलचेल..!
सुप्रसिद्ध बुवांची उपस्थिती ठरणार आकर्षण…!
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील भरड वरील श्री.दत्त मंदिरात शनिवारी ०१ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत.
१ ऑक्टोबरला संध्याकाळी ६ वाजता ‘श्री गांगेश्वर प्रसादिक भजन मंडळ ओरोस खुर्द’ बुवा – श्री. ज्ञानदेव मेस्त्री (विठूदास) गुरुवर्य श्री. चंद्रकांत कदम पख़वाज- बंटी मेस्त्री, भावेश मेस्त्री व ‘श्री ब्रम्हदेव प्रसादिक भजन मंडळ उपळे, राजापूर’ बुवा श्री. केदार कमलाकर कदम गुरुवर्य श्री. गुणाजी पाळेकर बुवा श्री. विजय परब बुवा पखवाज- सर्वेश पाळेकर तबला – ओंकार लब्दे यांच्यामध्ये प्रश्नोत्तरी भजनवारी सामना होणार आहे .
सोहळ्यातील इतर कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत.
१३ ऑक्टोबरला सत्यनारायण महापुजा
संध्याकाळी ५ वाजता – सुश्राव्य भजन.
रात्री १० वाजता – दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग.
किर्तन पंचक २०२२ विशेष
बुधवार दिनांक ०५/१०/२०२२
बुवा – श्री. विलास गरवारे कुरोली – सिद्धेश्वर, सातारा विषय – गरुड गर्वहरण
गुरुवार ०६/१०/२०२२
बुवा – श्री. हर्षद जोगळेकर, पुणे विषय- अरूणिमा सिन्हा (पर्वतारोही)
शुक्रवार ०७/१०/२०२२
बुवा – श्री. हरिहर नातू, मालवण विषय – कृष्णलीला
शनिवार ०८/१०/२०२२
बुवा – श्री. विवेक जोशी वाळपई (गोवा) विषय – रामेश्वर लिंग स्थापना
रविवार ०९/१०/२०२२
बुवा – श्री. श्यामसुंदर महाराज सोन्नर विषय – आदिशक्तीचा जागर
या कार्यक्रमाची सांगता श्री दत्त महाराज मंदिरातील ४२ दिवसांच्या श्री. गणेश विसर्जन सोहळ्याने, १५ ऑक्टोबर २०२२ रोजी चलचित्र देखावा आणि ढोल ताशांच्या गज़रातील मिरवणुकीने होणार आहे.
या सर्व भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्याला जिल्हावासिय , तालुकावासिय व शहरवासियांनी भरभरुन प्रतिसाद देत उपस्थित रहावे असे विनम्र आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)