वेंगुर्लेच्या कन्येचे मेकॅनिकल इंजिनिअरींगमध्ये 'अव्वल नंबरी' यश..!
वेंगुर्ला | ब्युरो न्यूज: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातल्या उभादांडा सुखटणवाडीतील रुपाली राजन पेडणेकर हिने मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये मॅकेनिकल इंजिनिअरींग (यांत्रिकी अभियंता) शाखेतून (CGPA 9.87) प्रथम क्रमांक मिळविला. रुपाली ही फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलजी रत्नागिरी या महाविद्यालयात शिक्षण घेतले असून पू. प्रा. शाळा उभादांडा नं. २ येथे तिचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा येथे तिने एस.एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. तिच्या या यशाबद्दल तिची प्रशंसा होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)