कोकणकन्या एक्सप्रेस धावणार 'सुपरडुपरफास्ट..!'
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्हा आणि कोकणवासीयांसाठी हक्काची असणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेस आता सुपरफास्ट होणार असून एकूण प्रवासाच्या वेळेत २ तास १० मिनिटांची बचत होणार आहे. एक्सप्रेस मधून सुपरफास्ट श्रेणीत या गाडीला बढती देण्यात आली आहे. कोकणकन्या सुपरफास्टचे नवे वेळापत्रक २० जानेवारी २०२३ पासून लागू होणार आहे. तसेच गाडीचा क्रमांकही बदलण्यात आला आहे. कोकणकन्या एक्सप्रेस आज २० सप्टेंबर पासून विद्युत इंजिनासह धावत आहे. यात कोकणकन्या एक्सप्रेसची गतीही वाढणार आहे. दरम्यान कोकणकन्या एक्सप्रेस ही गाडी आज पासून विद्युत इंजिनासह धावत असली तरी नवे वेळापत्रक २० जानेवारी २०२३ पासून लागू होणार असल्याची माहिती कोकण रेल्वे कडून देण्यात आली. मुंबई सीएसएमटी ते मडगाव जंक्शन या दरम्यान १०११२/१०१११ या ट्रेन क्रमांकाने कोकणकन्या एक्सप्रेस धावत आहे. आता २० जानेवारी २०२३ पासून कोकणकन्या सुपरफास्ट एक्सप्रेस २०११२/२०१११ या क्रमांकाने ही गाडी दररोज धावणार आहे.
कोकणकन्या सुपरफास्ट एक्सप्रेसचे २० जानेवारी २०२३ पासून लागू होणारे नवे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल.
मडगांव ते मुंबई सीएसएमटी (गाडी क्र.२०११२) : मडगाव – सायं.७.००, करमळी ७.४२, थिवीम ९.००, पेडणे ८.१२, सावंतवाडी ८.३६, कुडाळ ८.५८, सिंधुदुर्ग ९.१२, कणकवली ९.२८, वैभववाडी ९.५४, रत्नागिरी ११.१५, चिपळूण मध्यरात्री १२.३०, पनवेल पहाटे ३.५५, ठाणे ४.४२, दादर ५.१२, सीएसटीएम ५.४०. सीएसटीएम ते मडगाव (गाडी क्रं.२०१११) : सीएसएमटी रात्री ११.०५, दादर ११.१७, ठाणे ११.४५, पनवेल मध्यरात्री १२.२५, चिपळूण पहाटे ३.३०, रत्नागिरी ४.४५, वैभववाडी ६.१०, कणकवली ६.४२, सिंधुदुर्ग ७.००, कुडाळ ७.१२, सावंतवाडी ७.३२, पेडणे ७.५६, थिवीम ८.१०, करमळी ८.३२ आणि मडगाव ९.४६.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)