ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शाखा अभियंता अनिल तांबे यांची जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शाखा अभियंता अनिल तांबे यांची जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड..!

प्रकाशन: 20 Sep 2022 10:29 AM
वाचन संख्या 44

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
जिल्हा परिषद अभियंता संघटना सिंधुदुर्गच्या सन http://localhost/news/public/uploads/2022-2025 पर्यंतच्या कालावधीकरीता जिल्हाध्यक्षपदी जि.प.बांधकाम उपविभाग देवगडचे शाखा अभियंता श्री. अनिल भास्कर तांबे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.संघटनेच्या ओरोस येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. सदरची सभा मावळते जिल्हाध्यक्ष अभियंता शेखर आदण्णवार यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. संघटनेची उर्वरीत कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. उपाध्यक्ष- इंजिनियर अमित कल्याणकर(दोडामार्ग ), सचिव इंजिनियर प्रफुल्लकुमार शिंदे (वेंगुर्ले), सहसचिव – इंजिनियर गणेश म्हाडेश्वर(कुडाळ) ,कोषाध्यक्ष- इंजिनियर हेमंत पाडागावकर(ओरोस) ,इंजिनियर लक्ष्मण परुळेकर(ओरोस), सदस्य ,इंजिनियर सुहास टेमकर,सावंतवाडी-सदस्य ,इंजिनियर गणेश कडूलकर,कणकवली-सदस्य ,इंजिनियर प्रकाश कात्रे-मालवण,इंजिनियर सतीश रावराणे वैभववाडी, इंजि.वर्षाराणी जाधव-महिला प्रतिनिधी. तालुका अध्यक्ष खालीलप्रमाणे- इंजिनियर सुहास सावंत-वैभववाडी,इंजिनियर मिलिंद अतवाड-देवगड, इंजिनियर अक्षय मगर,मालवण,इंजिनियर प्रमोद जोईल,कणकवली, इंजिनियर मंगेश हवालदार(कुडाळ,) इंजिनियर प्रितम पवार,वेंगुर्ले. इंजिनियर भिवा आयनोडकर(दोडामार्ग), इंजिनियर सुदेश राणे(सावंतवाडी ),
मुख्यालय प्रतिनिधी – इंजिनियर मुकुंद पाचपिंपळे.
यावेळी मागील कार्यकारिणी सदस्यांचा त्यांनी संघटनेसाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला.नूतन अध्यक्ष इंजिनिअर अनिल तांबे यांनी याप्रसंगी बोलताना संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी एकजूट दाखवावी असे आवाहन केले. तसेच सदस्यांना कार्यालयीन व प्रशासकीय कामकाजात येणार्या अडचणी सर्वांना सोबत घेऊन सोडविण्यात येतील असे सांगितले.संघटनेचे नूतन सचिव इंजि.प्रफुल्लकुमार शिंदे यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स