नेत्रावती एक्स्प्रेस मधून पडुन एकाचा मृत्यू…!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे मार्गावरून गोव्याहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेस मधून प्रवास करीत असताना रेल्वे रुळावर पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नामदेव विष्णू काळे (वय५६,रा.कळंब, उस्मानाबाद)असे त्याचे नाव आहे.
ही दुर्घटना कणकवली तालुक्यातील हुंबरट दरम्यान आज १९ सप्टेंबरला सकाळी ६.४० वाजण्याच्या आसपास घडली.
दिवंगत नामदेव काळे यांच्यासोबत आणखीन एक व्यक्ती प्रवास करीत होती.
पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधून रत्नागिरी येथून कणकवली येथे बोलावून घेतले. या घटनेबाबत रेल्वे सुरक्षा बलाचे अजय भोई यांनी कणकवली पोलिसांना माहिती दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)