ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वस्तीची गाडी घेऊन गेलेल्या ड्रायव्हर चा मृतदेह सापडला मणचे खाडीत.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वस्तीची गाडी घेऊन गेलेल्या ड्रायव्हर चा मृतदेह सापडला मणचे खाडीत.

प्रकाशन: 19 Sep 2022 07:47 PM
वाचन संख्या 522

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
वस्तीची गाडी घेऊन गेलेल्या प्रशांत नार्वेकर ड्रायव्हरचा मृतदेह मणचे खाडीमध्ये सापडला आहे. सदर मृतदेह हा विजयदुर्ग आगारातील चालक प्रशांत प्रकाश नार्वेकर याचा असल्याचे उघड झाले आहे. मृत्यूचे कारण अजुनही अस्पष्ट असून पोलीस तपासानंतर खरे कारण निष्पन्न होणार आहे.
मणचे येथील खाडीमध्ये राजापूर कुंभवडे किनारपट्टीला एक मृतदेह आढळून आला होता या मृतदेहाची ओळख आत्ता पटली असून हा मृतदेह वस्तीची गाडी घेऊन गेलेला व बेपत्ता झालेल्या विजयदुर्ग आगारातील चालक प्रशांत प्रकाश नार्वेकर याचा असल्याचे ओळखीवरुन उघड झाले आहे.
विजयदुर्ग आगारातून मणचे येथे वस्तीची गाडी घेऊन गेलेला चालक प्रशांत प्रकाश नार्वेकर वय ३६ हा बेपत्ता झाला होता. संध्याकाळी ७.३० विजयदुर्ग आगारातून विजयदुर्ग मणचे ही वस्तीची गाडी सुटते ही गाडी मणचे बंदर येथे वस्तीला असते. रात्री जेवण झाल्यावर वाहक पी. एम. पालेकर यांना तुम्ही झोपा मी येतो असे सांगून नार्वेकर मोबाईलवर बोलत निघून गेले मात्र सकाळी ते सापडले नाहीत ही गाडी सकाळी साडेसहा वाजता मणचे येथून पुन्हा विजयदुर्ग कडे जायला सुटते. इकडे तिकडे शोधाशोध करून देखील नार्वेकर हे न सापडल्याने वाहक पी.एम. पालेकर यांनी चालक नार्वेकर हे बेपत्ता झाल्याची तक्रार विजयदुर्ग पोलिसांकडे दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स