ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या पुढाकारानंतर पालिकेच्या सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन स्थगित..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या पुढाकारानंतर पालिकेच्या सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन स्थगित..!

प्रकाशन: 19 Sep 2022 07:43 PM
वाचन संख्या 295

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी गेल्या काही दिवसांपासून कामबंद आंदोलन छेडले होते.
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या सक्रीय पुढाकारानंतर आज ते आंदोलन स्थगित केले गेले.

ठेकेदाराकडून अनियमित स्वरूपात मिळणारा पगार, हँड ग्लव्हज् आणि इतर सुरक्षा साहित्य न मिळणे यांसारख्या मूलभूत व इतर आवश्यक मागण्यांसाठी नगरपरिषदेच्या १५ कंत्राटी सफाई कामगारांनी चार दिवसांपासून कामबंद आंदोलन छेडले होते.
शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली असताना नगरपरिषद प्रशासन याकडे लक्ष देत नव्हते या पार्श्वभूमीवर कामबंद पुकारलेल्या १५ कर्मचाऱ्यांनी आज माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची विनंती केली होती.
यानंतर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर सर्व कर्मचाऱ्यांसह नगरपरिषदेमध्ये दाखल झाले. त्यावेळी तिथे नगरपरिषद मुख्याधिकारी उपस्थित नव्हते. कामगार प्रश्नी तोडगा काढणे आवश्यक असल्याने नगरपरिषद कर्मचारी व संबंधित ठेकेदाराला बोलावून घेत कामगारांच्या मागण्यांबाबत कामगारांसमोर चर्चा करण्यात आली.
कामगारांचा मागील थकीत पगार तत्काळ देण्यात यावा. हॅण्डग्लोव्हज्, बूट, कोट व अन्य साहित्य कामगारांना तत्काळ मिळावे. भरणा होणाऱ्या पीएफ ची माहिती कामगारांना मोबाईलवर मेसेज स्वरूपात मिळावी. यासह अन्य समस्या प्रशासन स्तरावर सोडवाव्यात. या कामगारांच्या मागण्या कांदळगावकर यांनी मांडल्या. त्यानुसार ठेकेदाराने कामगारांचा मागील थकीत पगार दोन दिवसात देण्याचे मान्य केले. कामगारांना बूट, कोट व अन्य सुरक्षा साहित्य तत्काळ देण्याचे मान्य केले. मागणीनुसार हॅण्डग्लव्हज् देण्याचेही मान्य केले.
कंत्राटी कामगारांसाठी सुफल चर्चेनंतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन स्थगित करत उद्यापासून कामावर हजर होणार असल्याचे स्पष्ट केले आणि माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्या तत्काळ सहकार्याबद्दल विशेष आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स