ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मंदार सांबारी यांना "नक्षत्र गौरव" पुरस्कार प्रदान..!

मंदार सांबारी यांना "नक्षत्र गौरव" पुरस्कार प्रदान..!

प्रकाशन: 19 Sep 2022 06:00 PM
वाचन संख्या 47

“साॅग साॅग “या मालवणी कवितेने जिंकली उपस्थितांची मने .

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : मालवण तालुक्यातील आचरा येथील प्रसिद्ध कवी मंदार सांबारी यांना पुणे येथील मानाचा समजला जाणारा नक्षत्र गौरव पुरस्कार रविवारी पुणे येथील राज्यस्तरीय काव्य मैफिल स्पर्धेत नक्षत्रांचे देणे काव्यमंच राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत,मॉडर्न काॅलेज पुणे प्राचार्य .राजेंद्र झुंझारराव,बालनाट्य चळवळ व ग्रंथपाल संघाचे माजी पदाधिकारी व परिक्षक .शंकर घोरपडे , मुंबईच्या माजी प्राचार्या सौ.अलका नाईक, मुंबई-गोवा महामार्गाचे स्थापत्य अभियंता वसंत टाकळे ,नक्षत्रांचे.देणे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष व कवी .उदय सर्पे.
तसेच महाराष्ट्रातील अनेक कवी आणि कवयित्री आदी उपस्थित होत्या.यावेळी मंदार सांबारी यांनी सादर केलेल्या” साॅग साॅग “या मालवणी कवितेने उपस्थितांची मने जिंकली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स