ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
सामाजिक वनीकरण विभाग कणकवली व राष्ट्रीय हरित सेना , माध्यमिक विद्यालय,कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ओझोन दिन साजरा..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सामाजिक वनीकरण विभाग कणकवली व राष्ट्रीय हरित सेना , माध्यमिक विद्यालय,कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ओझोन दिन साजरा..!

प्रकाशन: 19 Sep 2022 03:11 PM
वाचन संख्या 64

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सध्या विविध वाहने आणि उद्योग-धंद्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगभरात, विशेषत: मुंबई सारख्या भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषण इतके वाढले आहे की, लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. प्रदूषणामुळे लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्यावर थेट वाईट परिणाम होत असून तज्ज्ञांच्या मते, प्रदूषणाबाबत आगामी काळात ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर प्रदूषणाचे परिणाम आणखी धोकादायक बनू शकतात. वातावरणातील ओझोनचा थर सतत खराब होत आहे. ओझोनचा थर आपल्या पृथ्वीला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतो. या थराला होणाऱ्या नुकसानीमुळे लोकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होत असल्याची माहिती सामाजिक वनीकरण कणकवली विभागाचे वनक्षेत्रपाल विनोद बेलवाडकर यांनी कासार्डे येथे विद्यार्थ्यांना दिली.

सामाजिक वनीकरण विभाग कणकवली व राष्ट्रीय हरित सेना माध्यमिक विद्यालय,कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक ओझोन दिनाचे औचित्य साधून श्री.विनोद बेलवाडकर बोलत होते.
याप्रसंगी कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेचे प्राचार्य एम.डी.खाड्ये, खारेपाटण-फोंडाघाट विभागाचे वनपाल श्री शिवाजी इंदूलकर, राष्ट्रीय हरित सेनेचे विभाग प्रमुख अनंत काणेकर,विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मार्कंड, पी.जे. काळे,सांगवे वनरक्षक कु.राजश्री शेवाळे, पराग सावंत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एम.डी. खाड्ये यांनी करताना हवेचे प्रदुषण कमी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आणि त्याप्रमाणे जनजागृती करणे ही काळाची गरज आहे असे सांगून विद्यार्थ्यांनी ही माहिती पालकांपर्यंत पोहचवावी असे आवाहन करीत, उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

मानवाला त्वचारोग, कर्करोग, आणि लवकर वृद्धत्व येणे अशा अनेक समस्या निर्माण होतात , तसेच वनस्पतीच्या पानाचा, फळाचा,आकार कमी होणे. पिकांच्या उत्पादन घटणे आणि परागीभवनावरही परिणाम होतो. खारफुटी जंगलावर मोठा परिणाम होतो. प्राणी, पक्षी यांच्यावरही मोठा परिणाम होतो.ओझोन वायुंचा तर काही होत असल्याने ध्रुवावरील बर्फ वितळण्यावर परिणाम होत असून तेथील सजीव धोक्यात आले आहे. भरपूर बर्फ वितळल्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असून त्यामुळे जगभरातील भूभाग कमी होत आहेत असे बेलवाडकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार राष्ट्रीय हरित सेना कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे प्रमुख अनंत काणेकर यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स