देवबागला पलटली होडी ; एक मच्छिमार गायब
मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या देवबागच्या समुद्रात मासेमारी करून किनाऱ्याकडे येणाऱ्या एका मच्छिमारी नौकेला समुद्राच्या भीषण लाटांनी तडाखा दिल्याने होडी उलटून अपघात घडला. ही घटना आज सकाळी ९ :३० च्या दरम्यानची आहे असे सूत्रांकडून समजते आहे.
देवबाग येथील विष्णु बळीराम राऊळ हे पंचावन्न वर्षीय मच्छिमार बेपत्ता झाले असून गौरव राऊळ आणि गंगेश राऊळ या दोघाजणांना वाचविण्यात यश आले आहे अशी माहिती पोलिस पाटील येरागी यांनी दिल्याचे सूत्रांकडून समजते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)