भिरवंडेत शेतकऱ्याचा विद्युत तारांना स्पर्श होऊन दुर्दैवी अंत !
आज सकाळी ७ च्या दरम्यानची घटना.
कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावातील जांभुळभाटले वाडी येथील सत्यवान नारायण सावंत (वय ७८ ) यांचा विजेच्या प्रवाहित तारेला स्पर्श होत शॉक लागून दुर्दैवी अंत झाला. ही घटना आज सोमवारी सकाळी ७ च्या दरम्यान घडली.
दिवंगत श्री.सत्यवान सावंत रोजच्यासारखेच आजही सकाळी गुरे चारण्यासाठी घेऊन रानात गेले . यावेळी विजेच्या तुटलेल्या तारा त्यांच्या लक्षात आल्या नाहीत. त्यांचा विजेच्या तुटलेल्या तारांना स्पर्श झाला आणि त्यांचा जागीच अंत झाला.
याचवेळी येथे चरत असलेल्या गुरांना विजेच्या तारांचा नाजुकसा धक्का गुरांना बसल्याने गुरे तिथून पळाली. यामुळे ती बचावली ही घटना कळताच या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेनंतर संपूर्ण कणकवली तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)