योगेश बोडेकर यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार प्रदान..!
वैभववाडी | नवलराज काळे :
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या. सिंधुदुर्गनगरी वतीने ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वेंगुर्ला शाखेचे शाखाधिकारी श्री योगेश बोडेकर यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पतपेढीचे अध्यक्ष श्री नामदेव जांभवडेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. बोडेकर हे शिक्षक पतपेढीच्या वेंगुर्ला शाखेत शाखा व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. पतपेढीच्या उत्कर्षासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले ते उत्तम तंत्रस्नेही असून कार्यतत्पर कर्मचारी आहेत. यावेळी प्राथमिक शिक्षक पतपेढीचे विद्यामान संचालक मंडळ, सचिव श्री राजन भोगले, जिल्ह्यातील बहुसंख्य मालक सभासद उपस्थितीत होते. श्री योगेश बोडेकर यांचे या सन्मानाबद्दल शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे. तसेच भावी कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)