मालवणात मनसेने केला नगरपरिषदच्या कचरा गाडीवरील वाहन चालकांचा सत्कार.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आज नगरपरिषद कचरा गाडीवरील वाहनचालकांचा सत्कार करण्यात आला.
काल १७ सप्टेंबरच्या वाहन चालक दिवसाचे औचित्य साधून हा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला.
मनसे शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर यांच्या नगरपरिषद जवळच्या संपर्क कार्यालयात झालेल्या या सत्कारावेळी मनसेचे तालुका सचिव विल्सन गिरकर, शहर पदाधिकारी गुरु तोडणकर, शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर, मनसैनिक महेंद्र चोपडेकर , बाबू परब आणि प्रशांत प्रभू उपस्थित होते.
या सत्कार सभारंभाबाबत बोलताना मनसेचे उप शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी सांगितले की देशातील दळणवळण व परिवहन क्षेत्रातील वाहन चालकांचे योगदान अनन्यसाधारण आहे व शहरातील आरोग्य व नीटनेटकेपणामध्ये नगरपरिषद कचरा गाडीवरील वाहनचालकांचेही योगदान हे अमूल्य आहे व त्या अनुषंगाने मालवणातील मनसे पदाधिकारी,मनसैनिक यांनी मनसे प्रमुख श्री. राज ठाकरे व मनसेचे वरीष्ठ नेते व जिल्हा सरचिटणीस श्री. परशुराम ऊर्फ जीजी उपरकर , जिल्हा पदाधिकारी अमित इब्रामपूरकर व वरीष्ठ मनसैनिक व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार मालवण मनसेतर्फे आयोजीत केला गेला. यापुढेही सामाजिक योगदान देणार्या व्यक्तिंची,संस्थांची दखल घेऊन मालवणात मनसे तर्फे त्यांचा योग्य सन्मान केला जाईल असेही प्रतिपादन विशाल ओटवणेकर यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)