ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कट्टा येथे रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कट्टा येथे रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद…!

प्रकाशन: 17 Sep 2022 08:11 PM
वाचन संख्या 62

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद सावंत यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन…!

चौके | अमोल गोसावी :
माननीय पंतप्रधान यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आयोजित ‘सेवा पंधरवडा’ अभियान देशभर सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हा पंधरवडा भरगच्च कार्यक्रमांनी संपन्न होत आहे. आज या अभियानाचा शुभारंभ मालवण तालुक्यातील कट्टा येथे रक्तदान शिबिराने करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद (भाई) सावंत, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, मामा माडये, जिल्हा परिषद सदस्य संतोष साठविलकर, संदीप मेस्त्री, आशिष हडकर, राजन माणगांवकर, मामा बांदिवडेकर, शेखर पेणकर, शेखर मसुरकर, पप्या तवटे, संतोष पुजारे, स्वप्नील चिंदरकर, ललित चव्हाण, सुमित सावंत, मंदार पडवळ, जगदीश चव्हाण, विजय निकम, सागर माळवदे व इतर उपस्थित होते. मालवण तालुक्यातील युवा वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवत रक्तदान करून हा उपक्रम यशस्वी केला. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स