ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
बांदिवडे गांवचे सुपुत्र व प्रख्यात कबड्डीपटटू पुरुषोत्तम प्रभू यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या 'फिजिकल ट्रेनर' पदी नियुक्ती.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बांदिवडे गांवचे सुपुत्र व प्रख्यात कबड्डीपटटू पुरुषोत्तम प्रभू यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या 'फिजिकल ट्रेनर' पदी नियुक्ती.

प्रकाशन: 15 Sep 2022 05:55 PM
वाचन संख्या 104

चौके | अमोल गोसावी : देशात अहमदाबाद येथे 26 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत संपन्न होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी
महाराष्ट्राच्या पुरुष संघाचे ‘फिजिकल ट्रेनर’ म्हणून राष्ट्रीय खेळाडू पुरुषोत्तम प्रभू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
मालवण तालुक्यातील मसुरे गावातील बांदिवडे गावचे सुपुत्र व प्रख्यात कबड्डीपटटू पुरुषोत्तम प्रभू हे उत्कर्ष क्रीडा मंडळाचा राष्ट्रीय खेळाडू आहे.
महाराष्ट्र संघाच्या ‘फिजिकल ट्रेनर’ पदी दुसऱ्या वेळी नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या २० वर्षांहून अधिक काळ भांडुप च्या उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या संघातून कबड्डीचा सराव करीत असताना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या पुरुष गटाच्या प्राथमिक संघातून निवड झाल्यानंतर राष्ट्रीय खेळाडू पुरुषोत्तम प्रभू यांनी आव्हानात्मक परिस्थितीत कबड्डीला सामोरे गेले.
मुंबई उपनगरातून महाराष्ट्राच्या संघाला चांगले अष्टपैलू गुणवंत खेळाडू मिळाले पाहिजेत यासाठी पुरुषोत्तम प्रभू यांनी सातत्याने प्रयत्न केले.
कबड्डी खेळावर असलेली निष्ठा पाहून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने २१जुलै २०२२ ते २४ जूलै २०२२ या कालावधीत ६९ पुरुष गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा चरखी दादरी हरियाणा येथील झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष गटाचे संघाचे ‘फिजिकल ट्रेनर’पुरुषोत्तम प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली. ती कामगिरी त्यांनी यशस्वी केली.
त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघ व गुजरात ऑलिंपिक असोसिएशनच्या वतीने आणि गुजरात राज्य शासनाच्या सहकार्याने देशाची प्रतिष्ठित ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अहमदाबाद येथे २६ सप्टेंबर ते १ऑक्टोबर २०२२ या कालावधीत “इका इरीना ट्रान्स स्टेडियम” येथे होणार आहे.
त्या स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या पुरुष संघाचे ‘फिजिकल ट्रेनर’ म्हणून राष्ट्रीय खेळाडू पुरुषोत्तम प्रभू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकारणी सदस्य, राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह ॲड. आस्वाद पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रभू कार्यरत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स