ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवलीत युवासेनेतर्फे वेदांता- फॉक्सकॉन प्रकरणाबद्दल राज्य सरकारचा जाहीर निषेध.

कणकवलीत युवासेनेतर्फे वेदांता- फॉक्सकॉन प्रकरणाबद्दल राज्य सरकारचा जाहीर निषेध.

प्रकाशन: 15 Sep 2022 03:21 PM
वाचन संख्या 49

शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांची विशेष उपस्थिती.

कणकवली विधानसभा मतदारसंघात स्वाक्षरी मोहीम सुरु.

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सध्या बहुचर्चित अशा ‘वेदांता- फॉक्सकॉन’ कंपनीचा १.५४ लाख कोटींचा महाराष्ट्राच्या १ लाख तरुणांना रोजगार मिळवून देणारा प्रकल्प गुजरातला पळवून लावणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ आज कणकवली विधानसभा मतदारसंघात कणकवली शहर युवासेनेच्या वतीने कणकवली पटवर्धन चौकामध्ये स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवानेते संदेश पारकर, युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.


या दरम्यान “निषेध असो, निषेध असो… खोके सरकराचा निषेध असो, शिवसेना जिंदाबाद, ५० खोके एकदम ओके, स्वतःला खोके महाराष्ट्राला धोके, ४० गद्दारांचा निषेध असो “, अशा घोषणांनी शिवसैनिक व युवासैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, युवासेना जिल्हा समन्वयक राजू राठोड, उपतालुकाप्रमुख महेश कोदे,उपशहरप्रमुख वैभव मालंडकर, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, युवासेना शहर प्रमुख आदित्य सापळे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मस्जिद बटवाले, कलमठ विभागप्रमुख अनुप वारंग, तात्या निकम,रुपेश आमडोसकर, सिद्धेश राणे, तेजस राणे, बबन मुणगेकर, समीर मुणगेकर, आबू मेस्त्री, ईमाम नावळेकर, उत्तम लोके,किरण वर्दम, दिपक गुरव, सागर खोत, सोहेल नावळेकर, योगेश पेटकर, समीर सावंत, हर्षद सांगवेकर, अनिकेत घुरसाळे, अक्षय भोगटे, संकेत सावंत आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स