राणेंच्या प्रकल्पांना विरोध हाच शिवसेनेचा अजेंडा : भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर.
रोजगार व परकीय चलनापासून मालवण वंचित राखल्याची केली टीका.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी शिवसेनेवर प्रसिद्धीपत्राद्वारे टीका केली आहे.
आज जर ‘वेदांता फॉक्सकॉन’ गुजरातला गेल्याबदल शिवसेना शिंदे-भाजपा सरकारचा निषेध करत आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनासाठी आंतरराष्ट्रीय पटलावर आणणार्या सी-वर्ल्ड प्रकल्पाला का विरोध केला हे पण आता शिवसेनेने जाहिर करावे असा सवाल विजय केनवडेकर यांनी केला आहे.
जमिन मालकांमध्ये गैरसमज पसरवुन सी- वर्ल्ड प्रकल्पाचे तिन तेरा वाजवले का वाजवले ?
५० हजार जणांना थेट रोजगार व अप्रत्यक्ष १ लाख जणांना रोजगार मिळणारा प्रकल्पाला विरोध का केला ? भाजपाच्या फडणवीस राज्य सरकार कार्यकालात, जमिन अधिकरण करण्यासाठी ३०० कोटी निधी उपलब्ध करून दिला होता. १५० एकर जमिन शेतकरी स्वताहून देत होत. तसे सातबारा व हमीपत्र शेतकरी व जमिन मालकानी भाजपाकडे दिले होते व असे असताना सत्तेत असुनही शिवसेना त्याला विरोध का करत होती असे विचारत विजय केनवडेकर यांनी शिवसेनेने कोकणाच्या विकासाला कोणी खिळ घातली असा गंभीर आरोप केला आहे. सध्या सी-वर्ल्ड नियोजीत जागेत ना आधुनिक शेती झाली किव्हा शेती बागायतीचे लागवड क्षेत्र वाढले. या जागेत नाविन प्रकल्प शिवसेनेने आणला. शिवसेनेचे लोक प्रतिनिधी असताना २५ वर्षात नविन विकसनशील प्रकल्प का आणला नाही यांची पण उतरे निषेध करताना देणे आवश्यक आहेत. सी- वर्ल्ड ने सिंधुदुर्गाचा चेहेरा मोहरा बदलला असता. स्कुबा व वॉटर स्पोर्टसने बहुतांश पर्यटन वाढले आहे मग सी- वर्ल्ड आल्यावर परकीय चलनात मोठी वाढ झाली असती परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात आले असते हा साधा विचार शिवसेनेने केला नसल्याचे भाजपा मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे सांगितले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आणलेल्या प्रकल्पांना विरोध हा एकच अजेंडा ठेवण्यात समाधान मानून शाश्वत विकासापासुन कोकणवासीयाना वंचित ठेवण्याचा एक कलमी कार्यक्रम शिवसेनेने केला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी वेदांता फॉक्सकॉन सारखे प्रकल्प आलेच पाहिजे या प्रकल्पाबाबत सकारात्मक भुमिका घेणारी शिवसेना कोकणातील विकासासाठी येणाऱ्या प्रकल्पाला का विरोध करते हे पण स्पष्ट करावे. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी अशी भूमिका सोडून रोजगार निर्मिती प्रकल्पाला पाठिंबा द्यावा असा सल्ला भाजपा मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)