ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांद्यात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केली पूर परिस्थितीची पाहणी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांद्यात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केली पूर परिस्थितीची पाहणी.

प्रकाशन: 15 Sep 2022 11:37 AM
वाचन संख्या 46

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथे चालू आठवड्यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे बांदा आळवाडा बाजारपेठेत पाणी घुसले होते. या आपत्तीनंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज बांदा शहराला भेट देत तत्काळ ५० हजारांची मदत दिली. तहसीलदार श्रीनिवास पाटील यांना नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ अहवाल देण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांनी बांदा- शेर्ले पुलाची पाहाणी देखील केली.
पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यासाठी लागणारा आवश्यक निधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली, तर वाफोली येथे घराची भिंत कोसळून नुकसान झालेल्या परब कुटुंबीयांना रोख १० हजारांची मदत दिली.
शनिवार व रविवारी झालेल्या पावसामुळे मुसळधार बांदा – आळवाडा बाजारपेठेत काही दुकानांत पाणी घुसून नुकसान झाले. आज मंत्री केसरकर सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना प्रथम त्यांनी बांदा येथे भेट दिली. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, ग्रामपंचायत सदस्य राजेश विरनोडकर, माजी ग्रामपंचायत सदस्य हुसेन मकानदार, उद्योजक संदेश पावसकर, प्रीतम हरमलकर, भाऊ वाळके, पांडुरंग नाटेकर, सुनील धामापूरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्यामराव काळे, वर्षा नाडकर्णी, भैया गोवेकर अ उपस्थित होते. तलाठी वर्षा नाडकर्णी, भैया गोवेकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स