ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अठ्ठेचाळीस तासात पर्जन्याचे प्रमाण होणार कमी ; पुणे वेधशाळेचा अंदाज.

अठ्ठेचाळीस तासात पर्जन्याचे प्रमाण होणार कमी ; पुणे वेधशाळेचा अंदाज.

प्रकाशन: 15 Sep 2022 11:03 AM
वाचन संख्या 40

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सध्या असलेल्या कमी क्षेत्राचा
मध्य प्रदेशजवळ दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्रावरचा प्रभाव ओसरणार असल्याने राज्यातील पावसाचा जोर पुढील दोन दिवसांत कमी होणार आहे. आज विदर्भातील अनेक भागांत वादळी पाऊस, तर मध्य महाराष्ट्र व कोकणातील अनेक जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले असून ते सध्या मध्य प्रदेश व लगतच्या
भागावर आहे. हे क्षेत्र पुढील
२४ तास पश्चिम व वायव्येकडे सरकणार असून त्यानंतर वळून ते इशान्येकडे व उत्तर प्रदेशकडे मार्गक्रमण करणार आहे. यादरम्यान शुक्रवारच्या आसपास या क्षेत्राची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, त्याच्या प्रभावामुळे १४ ते १६ सप्टेंबरच्या दरम्यान मुसळधार, तर १७ सप्टेंबरला उत्तराखंड व उत्तरप्रदेशला अतिवृष्टीचा अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पूर्वोत्तर भारत व देशाच्या बऱ्याचशा भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स