श्री छत्रपती शिवाजी मंदिरात गरजणार 'गराजलो रे गराजलो..!'
मालवण | सुयोग पंडित : श्री. सोमेश्वर कलामंच मुंबई व कोकण निर्मित ‘गराजलो रे गराजलो’ तसेच अर्चना थिएटर्स निर्मित या दोन अंकी नाटकाचा प्रयोग दादारच्या श्री.छत्रपती शिवाजी मंदिर ( शिवाजी मंदिर ,दादर) नाट्यगृहात सादर होणार आहे.
कोकणी माणसाला व भूमीपुत्रांना जागृत करणार्या या नाटकाचा हा विशेष प्रयोग रविवारी १६ ऑक्टोबरला सादर होत आहे.
या प्रयोगाच्या तिकिटासाठी श्री.सोमेश्वर कलामंचचे संस्थापक अध्यक्ष व गराजलो रे गराजलो चळवळीचे प्रवर्तक श्री.सहदेव धर्णे यांच्याशी ९७०२०८७९३३ या क्रमांकावर संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.
१६ ऑक्टोबर हा रविवारचा दिवस असल्याने जास्तीत जास्त मराठी बांधव तसेच कोकणी व मालवणी माणसांनी या प्रयोगाला उपस्थिती लावावी असे विनम्र आवाहन श्री.सहदेव धर्णे व ‘गराजलो रे गराजलो’ च्या संपूर्ण संचाने केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)