ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अखिल पळसंब गांव मंडळाच्या वतीने अंतयात्रेसाठी लागणारी स्टीलच्या तिरडीचे (किडमिडीचे) लोकार्पण.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अखिल पळसंब गांव मंडळाच्या वतीने अंतयात्रेसाठी लागणारी स्टीलच्या तिरडीचे (किडमिडीचे) लोकार्पण.

प्रकाशन: 14 Sep 2022 02:35 PM
वाचन संख्या 270

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गावात आज, ‘अखिल पळसंब गांव मंडळ’ यांच्या वतीने अंतयात्रेसाठी लागणारी स्टीलच्या ‘तिरडीचे’ (किडमिडी) लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी मुंबईतील आणि गावातील लोक उपस्थित होते. तसेच गावचे सरपंच श्री चंद्रकांत
गोलतकर ग्रामसेवक,श्री कांबळी उपस्थित होते.
जेष्ठ नागरिक श्री रमेश परब यांनी प्रास्ताविक केले आणि मंडळाचे आभार मानले . श्री बाबुराव परब यांनी मंडळाचे कार्य समजावुन सांगितले तसेच श्री अनंत भंकाळ त्यांचे कौतुक केले की असलेली रक्कम योग्य ठिकाणी गुंतवणूक करून निधीत वाढ केली.
गांवचे ज्येष्ठ नागरीक व वस्तुनिष्ठ विचारवंत श्री गिरीधर पुजारे यांनी सदर वस्तू ही पर्यावरणला अनुसरून आहे असे नमुद करून स्मशानाच्या शेडच्या दुरुस्ती करण्यासाठी श्री सरपंच आणि ग्रामसेवक यांनी लवकरात लवकर प्रयत्न करावा अशी विनंती केली.
ग्रामसेवक श्री अमित कांबळी यांनी यासंबंधी शासकीय विलंबाबद्दल सविस्तर माहिती दिली आणि लवकरात लवकर शेड दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले.
सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांनी ग्रामस्थांना शेड संबंधित ह्यावर्षी करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
समस्त ग्रामस्थांचे आभार मानले.

शेवटी श्री प्रमोद सावंत यांनी औपचारीक आभार प्रदर्शन केले आणि तिरडीचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी गावातील मान्यवर नागरीक अनिल पुजारे ,अशोक जुवेकर, मेघ:श्याम जुवेकर. विद्याधर जुवेकर, रमेश मुणगेकर,
श्री मधुकर कदम ,मधुकर परब,संदीप सावंत ,विलास सावंत ,दादा गांवकर , मधुकर परब, प्रमोद सावंत, बाबुराव परब उपस्थित होते.
यावेळी सरपंच चंद्रकांत गोलतकर व ग्रामसेवक अमित कांबळी यांची उपस्थिती असल्याने व त्यांनी संबंधीत स्मशान शेड व इतर मुद्द्यांवर ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून त्यावर स्पष्टीकरण देत ते काम लवकरात लवकर होईल यासाठी प्रयत्न करण्याची याची ग्वाही दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स