ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने विविध सेवा कार्य आयोजित करुन " सेवा पंधरवडा " साजरा करणार……!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने विविध सेवा कार्य आयोजित करुन " सेवा पंधरवडा " साजरा करणार……!

प्रकाशन: 14 Sep 2022 01:06 PM
वाचन संख्या 51

उभादांडा – नवाबाग सागरकिनारा स्वच्छता अभियानाने सेवा पंधरवड्याचा शुभारंभ..!

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा वेंगुर्लेच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडाचे नियोजनाची बैठक प्रदेश कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यालयात संपन्न झाली.

यावेळी सेवा पंधरवडा – जिल्हा संयोजक प्रसन्ना देसाई यांनी प्रदेश भाजपाने दिलेली १७ सेवाकार्य कशा पद्धतीने करावी याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक सेवा कार्याला संयोजक व सहसंयोजक नियुक्त करून तालुक्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना जबाबदारी देण्यात आली.

यावेळी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर व कोवीड लसीकरण, कृत्रिम अवयव वितरण, वयोश्री योजनांचे कॅम्प, बुद्धीजीवी संमेलन, व्होकल फाॅर लोकल, स्वच्छ भारत अभियान, जल ही जिवन, वृक्षारोपण, तलाव स्वच्छ करणे, प्लॅस्टिक मुक्ती अभियान, आत्मनिर्भर भारत, एक भारत श्रेष्ठ भारत इत्यादी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
२ऑक्टोबर – गांधी जयंती निमित्त स्वदेशी, खादी, स्वावलंबन, साधेपणा आणि स्वच्छता याबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येणार असुन, खादीचा प्रसार होण्यासाठी खादीचे कपडे जास्तीत जास्त नागरीकांनी खरेदी करावे यासाठी जनजागृती अभियान राबविण्याचे नियोजन केले.

यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सुषमा खानोलकर, महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल व बाळा सावंत, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर, ता.चिटणीस समीर चिंदरकर व समीर कुडाळकर, ता.उपाध्यक्ष दिपक नाईक, महिला मोर्चाच्या वृंदा मोर्डेकर व रसीका मठकर, युवा मोर्चाचे नारायण कुंभार व पिंटू सावंत, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, आरवली सरपंच तातोबा कुडव, शक्ती केंद्र प्रमुख – संतोष शेटकर, महादेव नाईक, सुधीर गावडे, सतीश धानजी, गणेश गावडे, ताता मेस्त्री, खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर, सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार, अल्पसंख्याक सेलचे रफीक शेख, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाळु प्रभु व ज्ञानेश्वर केळजी, बुथप्रमुख – रविंद्र शिरसाट, शेखर काणेकर, विनय गोरे, दादा तांडेल, सुनील घाग, गुरुनाथ घाडी, दादा सावळ, पुंडलिक हळदणकर, सत्यवान पालव, उदय गावडे, सत्यवान परब, नारायण गावडे, शशी करंगुटकर तसेच तालुक्यातील बरेच पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स