ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पळसंब गांवठणवाडीच्या सुनबाई सौ.अनघा कापडी यांना एक्सलन्स प्रमाणापत्र प्रदान…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पळसंब गांवठणवाडीच्या सुनबाई सौ.अनघा कापडी यांना एक्सलन्स प्रमाणापत्र प्रदान…!

प्रकाशन: 14 Sep 2022 11:25 AM
वाचन संख्या 176

पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी संपूर्ण गावातर्फे केले सहर्ष अभिनंदन.

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पळसंब गांवठणवाडीच्या स्नुषा तथा सुनबाई सौ.अनघा महेश कापडी यांचा गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या ‘आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय,फोंडा’, यांच्यातर्फे त्यांच्या संस्कृत विषय अध्यापनाबद्दल विशेष गौरव करण्यात आला आहे.


‘राजहंस संकल्पना प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेने त्यांना ‘परफाॅरमन्स पार एक्सलन्स’ असे गौरवपत्र देऊन सन्मान केला आहे. सौ.अनघा कापडी यांनी २०२२ सालच्या गोवा बोर्डाच्या उच्चमाध्यमीक शालांत परिक्षेत शाळेसाठी १००% निकाल देऊन त्यांचे अध्यापन कौशल्य,जिद्द, व उत्कृष्टतेचे प्रमाण दिले असल्याचे राजहंस प्रायव्हेट लिमिटेड संस्थेने हा गौरव केला आहे.
या गौरवाबद्दल त्यांचे त्यांच्या सासर पळसंब गावातून अभिनंदन होत आहे.
पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी सौ.अनघा महेश कापडी यांचे गावातर्फे सहर्ष अभिनंदन केले आहे व पुढील अध्यापन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स