साळशी येथील श्री पावणाई मंदिरात १५ सप्टेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताह..!
संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व ८४ खेड्यांचा अधिपती असलेल्या देवगड तालुक्यातील साळशी येथील श्री देवी पावणाई मंदिरात गुरुवार १५ सप्टेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होणार आहे .हा हरिनाम सप्ताह गुरुवार १५ सप्टेंबर पासून २१ सप्टेंबर पर्यंत साजरा करण्यात येणार आहे.या सप्ताहाला शेवटच्या रात्री गावात रंगीत दिंडी काढली जाते.
तरी या हरिनाम सप्ताहात आपल्या भजनी मंडळी सह उपस्थित राहून सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन देवस्थान ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थ मंडळी यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)