ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
कळसुली शिक्षण संघ मुंबईचा ९३ वा स्थापनादिन सोहळा संपन्न.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कळसुली शिक्षण संघ मुंबईचा ९३ वा स्थापनादिन सोहळा संपन्न.

प्रकाशन: 13 Sep 2022 12:34 PM
वाचन संख्या 42

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
कळसुली शिक्षण संघ मुंबईच्या कळसुली इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स या प्रशालेत कळसुली शिक्षण संघ मुंबईचा ९३ वा स्थापनादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी १९८० च्या इयत्ता दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सूर्यकांत दळवी (उपकार्याध्यक्ष कळसुली शिक्षण संघ मुंबई ) यांनी भूषविले तर प्रमुख उपस्थितांमध्ये के.आर.दळवी (स्कूल कमिटी चेअरमन) नामदेव घाडीगावकर (व्हाईस चेअरमन स्कूल कमिटी) अतुल दळवी (स्कूल कमिटी सदस्य) ,रजनीकांत सावंत (स्कूल कमिटी सदस्य )१९८० च्या बॅचचे विद्यार्थी यामध्ये दाजी वारंग, श्रीकांत सावंत एस.पी.सावंत (माजी स्कूल कमिटी सदस्य) उत्तम वारंग इतर विद्यार्थी, प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. व्ही.वगरे, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर वृंद प्रशालेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये श्री.वगरे यांनी कळसुली पंचक्रोषीतील विद्यार्थ्यांना प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने कळसुली शिक्षण संघाची स्थापना १९२९ मध्ये झाली.तसेच कळसुली शिक्षण संघाचा आजपर्यंतचा इतिहास त्यांनी विशद केला. के.आर. दळवी सरांनी कळसुली शिक्षण संघाचा कार्यकाल त्याचे कामकाज आणि संस्थापकांचे परिश्रम याची माहिती विद्यार्थी वर्गाला करून दिली. त्याचप्रमाणे १९८० च्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या विविध आठवणींना उजाळा दिला.
दाजी वारंग आणि श्रीकांत सावंत,उत्तम वारंग यांनी १९८० च्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देऊन प्रशालेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व त्याच सोबत अभ्यास कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात सूर्यकांत दळवी यांनी संघाचे कामकाज आणि सुरुवातीच्या काळात संस्थापकांना सामोरे जावे लागलेल्या अडीअडचणींचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये केला. त्याचबरोबर नवीन इमारत बांधण्याचा मानस व्यक्त करून सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेला मदत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कळसुली शिक्षण संघाचे अध्यक्ष एस.व्ही.दळवी यांनीही याप्रसंगी संघाची वाटचाल आणि संघाला शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी मार्गदर्शन पर संदेश पाठवला होता. यासोबतच कार्याध्यक्ष पुरुषोत्तम दळवी सरचिटणीस विजय सावंत, माजी अध्यक्ष नामदेव दळवी आदि मान्यवरांनी संघाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शुभेच्छा संदेश पाठवले.त्याचे वाचन यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.जी.सावंत तर शेवटी आभार ज्येष्ठशिक्षक एस.के. सावळ यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स