आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर गणेशोत्सवा निमित्त जिल्हास्तरीय 'जोडी नृत्य' स्पर्धा १६ सप्टेंबरला.
सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठीच्या खुली-स्पर्धेचे ३५ वे वर्ष.
आयटम साँग , अश्लिल बिभत्स सादरीकरण आणि तोकड्या कपड्यांतील नृत्याला परवानगी नसल्याचे आयोजकांनी केले स्पष्ट.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर गणेशोत्सवानिमित्त शुक्रवार १६ सप्टेंबर २०२२ ला रात्री १० वाजता जिल्हास्तरीय जोडी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी खुली आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणा-या जोडीला रोख १८००० आणि चषक, व्दितीय क्रमांकाला ११००० आणि चषक, तृतीय क्रमांक ७००० आणि चषक व चतुर्थ क्रमांकाला 3000 रु. रोख आणि चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे ठिकाण इनामदार श्री देव रामेश्वर मंदिर आचरा असेल.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 09421037712- श्री विजय ऊर्फ बाबू कदम व 02365-246246 तसेच 09021580317-श्री राजु घाडी तसेच हाॅटेल आनंद भुवन यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
इनामदार श्री देव रामेश्वर हे पवित्र स्थान असून आयटम साँग तसेच अश्लिल, विभत्स आणि तोकड्या कपड्यात नृत्य चालणार नाही असे आयोजकांनी स्पष्ट करण्यात आले होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)