ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांचा आमदार वैभव नाईक यांच्यावर घणाघाती आरोप…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांचा आमदार वैभव नाईक यांच्यावर घणाघाती आरोप…!

प्रकाशन: 13 Sep 2022 12:20 PM
वाचन संख्या 99

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात भटके विमुक्त जाती व जमाती मधील समाज मोठ्या प्रमाणात आहे.तालुक्यातील धनगर वस्त्या अजून देखील मुख्य प्रवाहात आलेल्या नाहीत.अजून वाडीवर जायला जनतेला पायपीट करावी लागते. स्थानिक आमदार वैभव नाईक सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून कार्यरत होते तरी देखील या तालुक्यातील भटके विमुक्त समाजाच्या वाडीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करू शकले नाही ही शोकांतिका आहे. मालवण तालुक्यातील भटके विमुक्त जाती व जमाती मधील समाज बांधवांनी या गोष्टीचे आत्मपरीक्षण करून http://localhost/news/public/uploads/2024 ला परिवर्तन घडवून आणणे काळजी गरज आहे आणि आम्हाला खात्री आहे http://localhost/news/public/uploads/2024 ला नक्की परिवर्तन होणार.राज्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांची सत्ता आहे.जिल्ह्यात मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे यांसारखे नेतृत्व आमच्या पाठीशी आहेत.त्यामुळे मालवण तालुका भटके विमुक्त जाती व जमाती मधील समाज बांधवांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. मालवण तालुका भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष बाळा गोसावी तसेच जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भटके विमुक्त जाती व जमाती मधील समाज बांधवांच्या वाडीवस्तीवर पोहोचवणार विकास कामे त्यामुळे http://localhost/news/public/uploads/2024 ला कुडाळ मालवण विधानसभेवर कमळ फुलणार नवलराज काळे यांनी व्यक्त केला विश्वास. भाजप भटके विमुक्त आघाडीची मालवण तालुका कार्यकारणी तालुका अध्यक्ष बाळा गोसावी यांनी केली जाहीर. तालुक्यातील वाडी वस्तीच्या विकास कामांचा घेतला आढावा.रस्ते कामे, समाज बांधवांचे जातीचे दाखले व इतर वैयक्तिक बाबी समजावून घेऊन समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आमदार नितेश राणे साहेब व माजी खासदार निलेश राणे साहेब यांच्याकडे करणार पाठपुरावा जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी दिली माहिती.
यावेळी भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे, मालवण तालुका अध्यक्ष शांताराम उर्फ बाळा गोसावी,मालवण शहर अध्यक्ष अशोक मोहिते,जिल्हा कार्यकारणी सदस्य रवी चव्हाण,तालुका उपाध्यक्ष सुनील वरक,राजू मानवर,अमित गोसावी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स