ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुजीत जाधव संतप्त…!

शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुजीत जाधव संतप्त…!

प्रकाशन: 13 Sep 2022 12:13 PM
वाचन संख्या 181

शिंदे – फडवणीस सरकार ओबीसी, एससी, एन टी विरोधी असल्याचा केला घणाघाती आरोप.

संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुजीत जाधव यांनी शिंदे- फडणवीस सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे. उपजिल्हा प्रमुख सुजीत जाधव यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे ही टीका करताना सध्याच्या राज्य सरकारला धारेवर धरले आहे. परराज्यात शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या कक्षाधिकारी संगीता शेळके यांनी पत्र निर्गमित केले आहे. त्यामुळे आता परराज्यात व्यावसायिक शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या व्हीजे, एनटी, एसबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे अशी खंत सुजीत जाधव यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या व परराज्यात शिक्षणाकरिता गेलेल्या व्हीजे, एनटी, एसबीसी व ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने २५ मार्च २०२२ रोजी घेतला होता; परंतु सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय २ ऑगस्ट २०२२ च्या पत्रकाने रद्द केला आहे. २०१७-१८ या वर्षापासून केंद्राकडून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, परीक्षा, शिक्षण शुल्क, प्रतिकृती निर्वाह भत्ता दिला जाणार होता. इतर मागास बहुजन कल्याण विभाग ९ मार्च २०१७ रोजी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून वेगळा झाला. महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या आणि परराज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मॅट्रिकोत्तर ( दहावी पश्चात) शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा योजना लागू केली आहे. १ जुलै २००५च्या शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभागाने हीच योजना १ नोव्हेंबर २००३पासून विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागासवर्गातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात आली. इतर मागास बहुजन कल्याण विभाग २०१७मध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातून स्वतंत्र झाला. नंतर बहुजन कल्याण विभागाने यासंदर्भात परिपत्रक न काढल्याने राज्यातील व राज्याबाहेर प्रवेश घेतलेले ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले. ही अडचण दूर करण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने यंदा २५ मार्च रोजी शासन निर्णय काढून राज्याबाहेरील खासगी विनाअनुदानित व कायम अनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना २०१७-१८पासून शिष्यवृत्ती जाहीर केली. या माध्यमातून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, निर्वाहभत्ता विद्यार्थ्यांच्या खात्यावर ऑफलाइन पद्धतीने दिला जाणार होता. शिंदे-फडणवीस सरकारने हे परिपत्रकच रद्द केल्याने अडचण वाढली आहे.‘ओबीसी भाजपचा डीएनए असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात. इतर मागास व बहुजन कल्याण खाते भाजपकडेच आहे. पण, या सरकारने परराज्यात शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील ओबीसींची स्कॉलरशीप रद्द करून पहिलाच निर्णय समाजविरोधी घेतला असा गंभीर व संतप्त आरोप शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुजीत जाधव यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स