ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांनी व्यवसाय अधिकृत करण्यासाठी नौका सर्वे प्रक्रिया पूर्ण करावी : विष्णू मोंडकर.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांनी व्यवसाय अधिकृत करण्यासाठी नौका सर्वे प्रक्रिया पूर्ण करावी : विष्णू मोंडकर.

प्रकाशन: 13 Sep 2022 10:14 AM
वाचन संख्या 36

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांना संघटित करून जलक्रीडा व्यवसायात सुसूत्रता येण्यासाठी महासंघाचे प्रयत्न चालू असून जलक्रीडा व्यवसाय करण्यास परवानगी मिळण्यासाठी पर्यटन संचालनालय नवी मुंबई यांच्या कडे परवानगीसाठी ज्या व्यावसायिकांनी प्रस्ताव सादर केले आहेत त्यासाठी महासंघामार्फत प्रयत्न चालू आहेत. त्याचाच एक महत्वपूर्ण प्रक्रियेचा भाग नोंका सर्वे प्रक्रिया असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे जलक्रीडा व्यावसायिक प्रवासी व नोंका विहार, स्कुबा डायव्हिंग, पॅरॅसिलींग, वॉटरस्पोट व्यवसायाच्या माध्यमातून पर्यटकांसाठी सेवा देतात अश्या व्यावसायिकांना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून होणाऱ्या नोंका सर्वे प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. गेले सहा महिन्यापेक्षा जास्त काळ नोंका सर्वे साठी शासकीय फी जमा करून देखील नोंका सर्वे साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिकारी उपलब्ध होत नसल्यामुळे जलक्रीडा व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यासंबंधी पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे प्रयत्न चालू होते या पाठपुराव्यास महासंघास यश प्राप्त झाले असून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड च्या वतीने दिनांक १४ व १५ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांच्या नोंका सर्वे साठी अधिकारी उपस्थित राहून नोंका सर्वे प्रकिया पूर्ण करणार आहे. पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांना आवाहन करण्यात येते की जलक्रीडा व्यवसाय अधिकृत करण्यासाठी नोंका सर्वे प्रक्रिया पूर्ण करावी अशी माहिती विष्णू (बाबा) मोंडकर (अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ) यांच्या तर्फे देण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स