कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सिंधुदुर्ग यांच्यावतीने निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.
बॅरिस्टर नाथ पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजीत उपक्रम.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : यंदा बॅरिस्टर नाथ पै यांचे जन्म शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे. या निमित्त कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्गच्या वतीने निंबध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे.
निबंध स्पर्धेच्या खुल्या गटासाठी विषय – “कोकणच्या विकासासाठी बॅ. नाथ पै यांचे योगदान” यासाठी शब्द मर्यादा 1000 शब्द आहे. निबंध पाठवण्याचा पत्ता- गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर, मु. पो. माळगाव, बागायत, मालवण. सिंधुदुर्ग-416608, निबंध पाठवण्याचा अंतिम दिनांक http://localhost/news/public/uploads/20 सप्टेंबर http://localhost/news/public/uploads/2022 तारीख पर्यंत तसेच प्रथम क्रमांकासाठी-1500 रु. नाथ पै चषक प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांकासाठी 1200 रु. नाथ पै चषक व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकासाठी 1000 रु. नाथ पै चषक व प्रमाणपत्र, दोन उत्तेजनार्थसाठी-500रु, नाथ पै चषक व प्रमाणपत्र अशी पारितोषिके आहेत. अधिक माहितीसाठी रामचंद्र कुबल-9420210811 व गुरुनाथ ताम्हणकर-9420738375 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
वक्तृत्व स्पर्धा खुल्या गटासाठी विषय- “बॅ. नाथ पै एक युगनायक”, वेळ पाच मिनिटे (5). वक्तृत्व स्पर्धा दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता बँ. नाथ पै महाविद्यालय, MIDC कुडाळ येथे होणार आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी http://localhost/news/public/uploads/20 सप्टेंबर http://localhost/news/public/uploads/2022 अंतिम दिनांक असून वृंदा कांबळी 9421262030 यांच्याकडे नाव नोंदणी करावी. वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी 1500रु, नाथ पै चषक व प्रमाणपत्र, व्दितीय क्रमांकासाठी 1200रु. नाथ पै चषक व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकासाठी 1000रु, नाथ पै चषक व प्रमाणपत्र व दोन उत्तेजनार्थसाठी 500रु, नाथ पै चषक व प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.
स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग अध्यक्ष मंगेश म्हस्के-9421262030 व सचिव- विठ्ठल कदम यांनी केले आहे.
बक्षिस वितरण कार्यक्रम पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, भालचंद्र मुणगेकर, कुमार केतकर या मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी महालक्ष्मी हाॅल, कुडाळ येथे बॅ. नाथ पै जन्मशताब्दी अभिवादन सभा कार्यक्रमाला होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)